जलालपूरमध्ये व्यसनमुक्त युवक संघांच्या वतीने राबवण्यात आली स्वच्छता मोहीम 

कर्जत, १८ ऑगस्ट २०२०: श्रावणातील प्रत्येक सोमवारी कर्जत तालुक्यातील व्यसनमुक्त युवक संघाचे शिलेदार हे दर सोमवारी गावात आणि वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणाची  स्वच्छता करत होते.

पेडगाव येथील धर्मवीर गड या ठिकाणी वृक्षारोपण केले. त्या गडाच्या परिसरात वृक्षारोपण करून सामाजत गडांविषयी जनजागृती देखील केली. धर्मवीर गाडीवरील मंदिर हे संपूर्ण स्वच्छ धुवून घेतली. जलालपूर येथील नदी काठावरी तानाजी घाट तसेच सज्जन व्यासपीठ या ठिकाणी स्वच्छता करून त्यावरील सर्व हास्ती आणि राख काढून तो घाट स्वच्छ धुवून घेतला.

या वेळी व्यसनमुक्त युवक संघाचे शिलेदार बाळासाहेब कासारे व्यसनमुक्त युवक संघ तालुका अध्यक्ष कर्जत, पंडीत खैरे, मोहित ननावरे, सोमनाथ तांदळे, सागर धोत्रे, हे व्यसनमुक्त युवक संघाचे शिलेदार या मोहिमेत सहभागी झाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा