गोल पोस्ट इतर शुभेच्छा संदीप होळकर यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

संदीप होळकर यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

पिंपरी चिंचवड, १ मे २०२०: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त झाले आहे. हे सन्मानचिन्ह आतापर्यंत पोलिस सेवेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल देण्यात येते.

हे पदक पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पो. ना. संदीप होळकर,
पो.नि.गायकवाड, स.फौ.राठोड, पो.हवा.आवटे, पो.हवा. श्रीमती गायकवाड, पो.हवा.शेटे, पो.हवा.शेख, पो.ना.श्रीमती लोहकरे, पो.ना.बनसुडे यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल देण्यात आले आहे.

यातील पोलिस नायक संजय होळकर यांच्या विषयी अधिक माहिती अशी की, गेली वीस वर्षे ते पोलीस सेवेत रुजू आहेत. सध्या ते पोलिस नायक या पदावर नियुक्त आहेत. या आधी त्यांनी सहा वर्षे क्राइम ब्रांच मध्ये काम केले आहे. सध्या त्यांची नेमणूक हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये आहे.

पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त झालेल्यांची यादी सध्या जाहीर करण्यात आली आहे, परंतु याचे वाटप १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री किंवा इतर उच्च अधिकाऱ्यांकडून प्रदान केले जातील. या सर्वांचे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयाकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version