संजय जगताप यांच्याकडून ३०० कुटुंबाना किराणा किटचे वाटप

सासवड, दि.९ मे २०२०: कोरोनासारख्या जागतिक महमारीमुळे देशात सर्वत्र लोकडाऊन घोषित केला आहे. नाभिक समाजाने त्यापूर्वी काही दिवस आधीच सामाजिक जबाबदारी ओळखुन आपला व्यवसाय बंद केला होता. साधारण दोन महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या नाभिक बांधवांना पुरंदरचे आमदार संजय चंदूकाका जगताप यांनी एक महिना पुरेल इतका किराणा घरपोच केला आहे. यामुळे अडचणीत सापडलेल्या नाभिक बांधवाना दिलासा मिळाला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून नाभिक बांधवांचे व्यवसाय बंद आहेत. दुकानाचे भाडे, कर्जाचे हफ्ते, दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले असताना, सासवडचे माजी नगरसेवक मोहन शिंदें यांनी पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील सासवड, नीरा, जेजुरी, भिवडी, वीर,माळशिरस, परींचे, गराडे आदी गावातील गरजू तीनशे कुटुंबाना एक महिना पुरेल इतका किराणा उपलब्ध करून दिला.

या संसारपयोगी किराणा किट मध्ये तेल, दोन प्रकारच्या डाळी, साखर,गहू,मीठ, चहा पावडर, मसाले, तांदूळ, साबण इत्यादी साहित्यांचा समावेश आहे.
यासाठी पुरंदर तालुका नाभिक महामंडळाचे अध्यक्ष राहुल मगर, सागर विभाड, नवनाथ मोरे, सुशील गायकवाड, बापू राऊत, दत्ता मोरे, बालाजी शिंदे, बंटी शिंदे, सचिन क्षीरसागर, संतोष पांडे, निरेतील माऊली गायकवाड, योगेश राऊत, बाळासो गायकवाड, नंदकुमार काशवेद, अजय राऊत आदी कार्यकर्त्यांनी किराणा किट घरपोच करण्याची व्यवस्था केली.
यावेळी पुरंदर तालुका नाभिक संघटनेने आमदार संजय जगताप व मोहन शिंदे यांचे आभार मानले.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा