संजय पवारांचा इशारा…‘संभाजीराजे आमचे छत्रपती, पण शिवसेनेवरील टीका खपवून घेणार नाही’

मुंबई, 14 जून 2022: नुकतीच राज्यसभा निवडणूक पार पडली. मात्र ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. सहाव्या जागेसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली. पण भाजप ने या जागेवर बाजी मारली. राज्यसभेच्या निवडणुकीत मोठा हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. शिवसेनेकडून संजय पवार यांना उभं करण्यात आलं तर भाजप कडून महाडिक यांना. या विजयानंतर भाजपला कोल्हापुरात नक्कीच आपले पाय भक्कम करण्यास संधी मिळाली आहे.

मात्र, पराभवानंतर शिवसेनेचे संजय पवार काल माध्यमांसमोर आले. त्यावेळी त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांना इशारा दिलाय. संभाजीराजे हे आमचे छत्रपती आहे. मात्र, शिवसेनेवरील टीका खपवून घेतली जाणार नाही. मराठा मावळा हरला असे पोस्टर लावणे अत्यंत दुर्दैवी आहे, असं संजय पवार म्हणाले.

माध्यामांशी बोलताना संजय पवार म्हणाले की, तुम्ही आमचे छत्रपती आहात. मात्र शिवसेनेवरील टीका खपवून घेतली जाणार नाही. मराठा मावळा हरल्याचे पोस्टर लावणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. शिवसेनेकडे मतं मागायला तुम्ही आला होता. शिवसेनेचे वाघ जंगलातील आहेत, सर्कशीतील नाही. राज्यसभा निवडणुकीत कुठे दगाफटका झाला याचा शोध वरिष्ठ घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करुन आधार दिला. इथून पुढे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार काम सुरु ठेवणार, असं संजय पवार म्हणाले.

‘मावळा हरल्याचे पोस्टर्स लागणं दुर्दैवी’

त्यानंतर आता राज्यसभा निवडणुकीत आपला उमेदवार निवडून येणार असं संजय राऊत ठामपणे सांगत होते. मात्र, भाजपच्या धनंजय महाडिकांनी संजय पवारांचा पराभव केला. तो पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याचा धागा पकडत मावळा हरल्याचे पोस्टर काही भागात लावण्यात आले होते. त्यावरुच आता संजय पवार यांनी असे पोस्टर्स लागणं दुर्दैवी असल्याचं म्हटलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा