महायुती सरकारचा आणखी एक मंत्री गोत्यात ; संजय राऊत म्हणाले त्यांच्यासारखा विकृत..,

26
Sanjay Raut allegations against Jayakumar Gore Jyakumar Gore News Sanjayb Raut
संजय राऊत यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीरन आरोप केला आहे.

Sanjay Raut Accusation: तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांची सुद्धा आमदारकी आज कोर्टाच्या निर्णयावर ठरणार आहे. त्यातच महाविकास आघाडीने महायुती सरकारमधील दोन नेत्यांवर गंभीर आरोप केल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठे नेते विजय वडेट्टीवार यांनी उत्तर महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील यांची जमीन हडपल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत महायुती सरकारच्या पोटावर बोट ठेवले आहे.

काय म्हणाले संजय राऊत

देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळचे आणि लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वारगेट सारखेच प्रकरण केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ते आज मध्यमांसमोर बोलत होते. ते म्हणाले, जयकुमार गोरे एक विकृत मंत्री आहेत. अशी गंभीर टीका त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका स्त्रीचा, मंत्री गोरे यांनी छळ आणि विनयभंग केल्याची माहिती संजय राऊत यांनी मध्यमांना दिली आहे. ती महिला येत्या काही दिवसात विधान भावनासमोर उपोषणाला बसणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा