संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यात आढळले ब्लॉक?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून छातीत वेदना होत असल्याने आज (सोमवारी) शिवसेना खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.
दोन दिवसांची विश्रांती घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. पुढचे दोन दिवस संजय राऊत कुणालाही भेटणार नाहीत असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. तसेच त्यांच्या रक्त वाहिन्यात दोन ब्लॉक आढळल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

संजय राऊत निवडणूक निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवसापासून चर्चेत आहेत. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यांना छातीत वेदना होत होत्या. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुढचे दोन दिवस संजय राऊत यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे ते पुढचे दोन दिवस रुग्णालयातच असणार आहेत.
त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजपावर निशाणा साधला होता. निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून ते दररोज पत्रकार परिषद घेत होते. तसेच पक्षाची भूमिकाही घडणाऱ्या घडामोडींनंतर माध्यमांसमोर मांडत होते. या सगळ्या कामाचा ताण संजय राऊत यांना आला आहे.
त्याचमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा