संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला – महाराष्ट्रात नवा ‘हिंदू ओवेसी’ तयार झालाय

मुंबई, 17 एप्रिल 2022: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या लाऊडस्पीकर वक्तव्यानंतर येथील राजकारणात खळबळ उडाली आहे. नेत्यांची भाषणबाजीही सुरूच आहे. दरम्यान, शिवसेना पक्षनेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधलाय. राज ठाकरे यांचं नाव न घेता त्यांनी टोला लगावला की, आता महाराष्ट्रातही नवे हिंदू ओवेसी तयार झाले आहेत. भाजपने ओवेसींना जो प्लॅन यूपीमध्ये वापरला, तीच योजना आता महाराष्ट्रातही भाजपला आजमावायची आहे, असं राऊत म्हणाले. पण आम्हाला काळजी नाही. पब्लिक सर्व काही जाणते, सहन करते, प्रतिसाद देते.

मिळालेल्या माहितीनुसार, एका मीडिया संस्थेशी बोलताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ओवेसी असं म्हंटलं. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर शनिवारी सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी सामना वृत्तपत्राच्या कार्यालयाबाहेर पोहोचून राज ठाकरेंच्या छायाचित्राचे पोस्टर लावलं.

सामनाच्या कार्यालयाबाहेर राज ठाकरेंचे पोस्टर

शिवसेनेच्या सामना या वृत्तपत्राच्या कार्यालयासमोर मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या छायाचित्राचं मोठं पोस्टर लावलं आहेत. पोस्टरच्या माध्यमातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना मनसेकडून इशारा देण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांची गाडी पलटी केल्याचे बोलले जाते. त्याची पुनरावृत्ती करायची का?, असा सवाल मनसेकडून पोस्टरच्या माध्यमातून करण्यात आलाय. संजय राऊत यांनी त्यांचा लाऊडस्पीकर बंद करावा अन्यथा मनसे त्यांच्या स्टाईलमध्ये बंद पाडेल, असं या पोस्टरमध्ये लिहिलं आहे.

काय होतं राज ठाकरेंचं वक्तव्य

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी 12 एप्रिल रोजी ठाण्यात झालेल्या मेळाव्यात राज्य सरकारला 3 मे पर्यंत मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्यास सांगितलं होते. लाऊडस्पीकर न काढल्यास पक्षाचे कार्यकर्ते मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवतील, असंही ते म्हणाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा