आज होणार संजय राऊतांच्या जामीनावर फैसला, शिवसेनेची तोफ आज तुरुंगाबाहेर येणार?

7

मुंबई, दि ९ नोव्हेंबर २०२२ : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने राऊत यांच्या जामीन अर्जावरील आपला निर्णय राखून ठेवला होता. यावर आज सुनावणी होणार असून आज न्यायालय आपला फैसला सुनावणार आहे.

दरम्यान, आपल्यावर केलेले तपासयंत्रणेचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर, संजय राऊतच संपूर्ण घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत न्यायालय काय निकाल देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीनावर एकाच दिवशी आज (९ नोव्हेंबरला) न्यायालय निर्णय देणार आहे.

खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील मागील सुनावणी २ नोव्हेंबरला पार पडली होती. यावेळी राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीने आपले लेखी उत्तर न्यायालयात सादर केले. त्यानंतर न्यायालयाने जामीनावरील आपला निकाल राखून ठेवला होता. आज होणाऱ्या सुनावणीत न्यायालय यावर निकाल देणार आहे.

मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात खासदार संजय राऊत आणि प्रविण राऊत हे दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज एकाच दिवशी न्यायालयाकडून निकाल देण्यात येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा