संस्कृती मराठी मंडळाकडुन दुबई मध्ये आषाढी एकादशी भक्तिमय वातवरणात साजरी

दुबई, ३ जुलै २०२३: महाराष्ट्रातील मराठी मंडळी दुबईत सुद्धा आपले संस्कार, आपले सण, आपली संस्कृती जपताना दिसतात. वर्षानुवर्षे दुबईत सण साजरे करणाऱ्या संस्कृती मराठी मंडळाने, यावर्षी आषाढी एकादशी निमित्त ‘कानडा राजा पंढरीचा’ हया भक्तीगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी केकॉलॉजी, एएक्स प्रॉपर्टीज, देसी मार्ट, मुंबई अड्डा यांची साथ लाभली.

अतिशय भक्तिमय वातावरणात दुबईतील शेकडो भक्तांनी या कार्यक्रमास हजेरी लावली. श्री पांडुरंग आणि रखुमाई च्या मूर्तीची पूजा करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. सिंधूपुत्र प्रासादिक भजनी मंडळ यांच्या भजनाने वातावरण सुरेल भक्तिमय होऊन गेले. तसेच कु.काव्या खोत आणि नव्या दाभोळकर हया लहान मुलींनी अतिशय सुरेख पांडुरंगाचे अभंग सादर केले. ते ऐकताना श्रोते भक्तिरसात भिजून गेले.

श्री व सौ मिलिंद माणके, श्री सिद्धांत शिंदे, श्री. ओमकार चेवलकर यांनी देखील श्री विठ्ठलाच्या गाण्यांचे आपल्या सुरेख आवाजात सादरीकरण केले. कार्यक्रमाला श्री संदिप कड, श्री अमोल दुबे पाटिल, श्री चंद्रशेखर जाधव, श्री अभिजीत देशमुख, श्री संदिप शिंपी, श्री प्रशांत शिंपी, श्री सुशांत चिल्लाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.किशोर मुंढे आणि संस्कृती मराठी मंडळाच्या सभासदांची साथ लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रुपाली पवार आणि सौ. माधुरी पाटिल यांनी केले.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा