डोर्लेवाडी, बारामती: डोर्लेवाडी येथील संत तुकाराम महाराज प्राथमिक विद्यालयामध्ये सौ.यमुनाबाई काळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बुधवार दि.(८) आनंद मेळावा व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते गुरुवारी (दि.९) “आई” या विषयावर अमोल महाराज सूळ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
शुक्रवार (दि.१०) आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते शनिवार (दि.११)महाविद्यालयाने आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या स्पर्धेत लहान गट. आशितोष दादाराम काळोखे-प्रथम,समदिशा अजित
ताटे-द्वितीय,अस्मिता लक्ष्म नाळे-तृतीय,अनुष्का संदीप चोपडे-चतुर्थ, तर कु.आर्या महेश शिंदे हिस उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले तसेच मोठा गट – ओम दिलीप गाडे – प्रथम, सचिन कोळेकर -द्वितीय- यश अनिल भोपळे-तृतीय,सुहानी समित शहा-चतुर्थ तर समीक्षा रविंद्र नेवसे- हिस उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. तसेच रविवारी (दि.१२) राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमाँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त डोर्लेवाडी गावातून लेझीम व ढोलतश्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच यावेळी महाविद्यालयात तालुकास्तरीय वक्तृत्त्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन गावचे सरपंच बाळासाहेब सलवदे व तंटामुक्ती अध्यक्ष मिलिंद भोपळे यांनी केले.वक्तृत्व स्पर्धेमध्ये तालुक्यातील ४६ शाळांनी आपला सहभाग नोंदविला होता या स्पर्धेत लहान गट- वैष्णव संतोष जांबले ( विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा बारामती )हीचा प्रथम क्रमांक, पृथ्वीराज प्रकाश ओवेकर ( महात्मा गांधी बालक मंदिर बारामती) द्वितीय क्रमांक, मोक्षा आदर्श दोषी ( सौ.निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक मुलींची शाळा ) तृतीय क्रमांक, हर्षद संदीप शिंदे ( सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा) चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. मध्यम गट-सिद्धी प्यारेलाल गावडे ( न्यू इंग्लिश स्कूल मेखळी ) प्रथम क्रमांक,सृष्टी बापूराव कोकरे ( छत्रपती मुलींचे हायस्कूल ) द्वितीय क्रमांक स्मृतिका पांडुरंग ढवाण ( शारदाबाई पवार विद्यानिकेत शरदानगर ) तृतीय क्रमांक, सिद्धी मंजाबापू बडे ( झेनोबिया इंग्लिश मेडीयम स्कूल , कटफल )चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले तसेच मोठा गट वेदांत उमेश सुभेदार ( भक्तीवेदांत जीवन शिक्षण गुरुकुल स्कूल , बारामती ) प्रथम,जान्हवी राजेश मत्रे ( अनेकान्त इंग्लिश मीडियम स्कूल , बारामती )द्वितीय,निलेश भाऊसाहेब मुळीक* ( सातव हायस्कूल , बारामती ) तृतीय,अंकिता अंकुश मोरे ( विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक विद्यालय , बारामती )चतुर्थ पारितोषिक क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले कार्यक्रमाचे परीक्षक किशोरी सातव,प्रा.रवींद्र टिळेकर, प्रा.सुभाष साखरे, कुंभार यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी पार पाडले.शाळेने केलेल्या नेटनेटक्या संयोजनामुळे कार्यक्रम चांगल्या वातावरणात पार पडला तर शाळेतील विद्यार्थी व स्पर्धक यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. सर्व सहभागी शाळा व पारितोषिक विजेत्या स्पर्धकांचे विद्यालयाचे प्रमुख महादेव काळे व काळे मॅडम यांनी अभिनंदन केले