छत्रपती संभाजीनगर ६ फेब्रुवारी २०२५: आष्टी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आष्टी मतदारसंघातील कृष्णा- मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या कुटेफळ सिंचन प्रकल्पाचे भूमीपूजन केले. या प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या दुष्काळाची समस्या कमी होईल, अशी आशा फडणवीस यांनी व्यक्त केली.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर सभेत मोठा संदेश दिला. “कोणीही कितीही मोठा असला तरी या प्रकरणात कोणालाही सुटू देणार नाही,” असं म्हणत फडणवीस यांनी या प्रकरणातील लढाईमध्ये आमदार सुरेश धस यांना पुन्हा पाठिंबा दिला आहे.
या कार्यक्रमात पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. परंतु धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. सुरेश धस यांच्या समर्पण आणि जिद्दामुळे या प्रकरणात ते अधिक प्रभावी झाले असून, त्यांनी आपल्या संघर्षाच्या माध्यमातून स्थानिक जनतेला विश्वास दिला आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणामुळे मराठवाड्याच्या विकासाची गती वाढल्याची भावना व्यक्त होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी ; सोनाली तांबे