‘सराईत गुन्हेगारां’च्या हद्दपारीसाठी वंचितचा मोर्चा

पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील सराईत गुन्हेगारांना हद्दपार करावे, या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.

कोरडगावमधील सराईत आरोपी खुलेआम फिरत असून त्यांना हद्दपार करावे ही मागणी करत बुधवारी दुपारी वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे नेते प्रा.किसन चव्हाण यांच्या नेवृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. वसंतराव नाईक चौक, नगररोड मार्गे पाथर्डी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेल्यात आला. पोलीस ठाण्याच्या आवारात प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या मोरच्यात प्यारेलाल शेख, माजी नगरसेवक तुकाराम पवार, रवींद्र म्हस्के, सुनील जाधव, नितीन पवार, तात्यासाहेब घुगरे, फिरोज शेख, बाळासाहेब म्हस्के, विठ्ठल मासाळ, मल्हारी घुगरे, परभती देशमुख, साहेबराव देशमुख, वसंत देशमुख, विनायक देशमुख, कानिफ काकडे, कैलास मासाळ, बद्री चातुर, आशीर्वाद कचरे, शैलेंद्र बोदर्डे, महेश पवार, इसुफ शेख, बेबीताई रावतळे, साखराबाई म्हस्के, आकाश म्हस्के, अमर शेख, योगेश मोरे आदी कोरडगावचे ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते.
पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांना निवेदन देण्यात आले. पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. येत्या पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा