कोल्हापूर, ३ ऑगस्ट २०२३ : चित्रपट हे अतिशय संवेदनशील माध्यम असून सरस्वती का सावित्रीमाई? या चित्रपटातून सत्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. किसनराव कुराडे यांनी मांडले. ते निर्मिती फिल्म क्लब निर्मित सरस्वती का सावित्रीमाई? या अतिशय महत्वाच्या व संवेदनशील मराठी दीर्घ लघुचित्रपटाचा प्रीमियर शो प्रसंगी बोलत होते. हा प्रीमियर शो प्रचंड गर्दीने हाऊसफुल झाला.
सरस्वती का सावित्रीमाई? या चित्रपटाची संकल्पना धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टची असून निर्मिती, निर्मिती फिल्म क्लबने केली आहे. दिग्दर्शन अनिल म्हमाने, महेश्वर तेटांबे, निर्मात्या डॉ.शोभा चाळके, सहनिर्माता अनिरुद्ध कांबळे, क्रियेटिव्ह हेड ॲड. करुणा विमल, सहदिग्दर्शन अरहंत मिणचेकर यांचे तर संकलन राजवीर जाधव यांनी केले असून डी.ओ.पी. म्हणून अमर पारखे यांनी काम पाहिले आहे.
कथा आणि संवाद अनिल म्हमाने यांची असून आदित्य म्हमाने, कनिष्का खोबरे, तक्ष उराडे, अमिरत्न मिणचेकर, स्वरा सामंत, मंथन जगताप, अनघा सुतार, पुष्कर कुसूरकर, अन्वय म्हमाने, स्वराज किरवेकर, स्वरल नामे, अतीफ काझी, पृथ्वीराज वायदंडे, वेणू तिप्पाण्णावर, श्रीजा पाटील, इझयान मुरसल, ऋतुजा शिंदे, विघ्नेश शिंदे, प्रांजल सुरवशी, प्रित्युश्री सुरवशी, नाज कुरणे, अरिज कुरणे, प्रिया नलवडे, प्रणव कुलकर्णी, राजलक्ष्मी लिमजे, किशोर खोबरे, डॉ. निकिता खोबरे, शण्मुखा अर्दाळकर, शब्बीर काझी, छाया पाटील, संजयकुमार अर्दाळकर, नामदेव मोरे, अरिफ काझी, डॉ. स्नेहल माळी, रुपेश कुसूरकर, जयश्री नलवडे, सुषमा शिंदे, आयेशा काझी, शाहरुख मुजावर, मुनिरा मुजावर, प्रकाश किरवेकर, संगीता लिमजे यांच्यासह शंभरहून अधिक कलाकारांनी यात अभिनय केला आहे.
प्रीमियर शोला ज्येष्ठ लेखक व विचारवंत राजाभाऊ शिरगुप्पे, माजी आमदार राजीव आवळे, ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि लेखक ॲड. कृष्णा पाटील, ज्येष्ठ सामाजिक विचारवंत प्रा. टी. के. सरगर, कवी व लेखिका डॉ. शोभा चाळके, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल, डॉ. नंदकुमार गोंधळी तासगावचे माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे, स्वप्निल गोरंबेकर यांच्यासह चित्रपटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर