गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट सरफराज अहमदने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घ्यावी: रमिज राजा

सरफराज अहमदने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घ्यावी: रमिज राजा

इस्लामाबाद, १२ ऑगस्ट २०२०: पूर्व पाकिस्तानी क्रिकेट संघाचे कॅप्टन रमिज राजा यांनी पाकिस्तानी संघाचा विकेट कीपर फलंदाज सरफराज अहमद याने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घ्यावी आणि व्हाईट बॉल क्रिकेट मध्ये लक्ष केंद्रित करावे असे म्हंटले आहे.

यंदाच्या इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान कसोटी सामन्यांमध्ये सरफराज अहमदला संघात स्थान मिळाले आहे. परंतु, संघात खेळायची संधी अजून मिळाली नाही. मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात त्याला १२ वा खेळाडू म्हणून खेळायला मिळाले.

रमिज राजा  म्हणाले की, ”एकेकाळी तुम्ही संघाचे नेतृत्व करता आणि आता बेंच वर बसता हे खूप कठीण आहे. तसेच सरफराज अहमदने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन फक्त व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये आपले लक्ष केंद्रित करावे.” असे ते म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

error: Content is protected !!
Exit mobile version