सरकार चुकले तर ठोकायला मागेपुढे पाहणार नाही – राजु शेट्टी

बारामती : भाजप सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी सोबत आहोत. मात्र चुकीच्या धोरणांना आमचा पाठिंबा नाही तसे झाल्यास राज्यातील सरकारला ठोकून काढायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही. असे विद्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.
बारामती येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
नुकत्याच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल घेतलेल्या चुकीच्या निर्णयावर आम्ही आठ तारखेला ग्रामीण महाराष्ट्र तर देशातील २६२ शेतकरी संघटना भारत बंदमध्ये सहभागी होणार आहेत. रस्त्यावर उतरून आम्ही कडकडीत बंद पाळण्यात असल्याचे संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी म्हणाले.

बारामती शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राज्यात विकास आघाडीच्या माध्यमातून सत्तांतर झाले यामध्ये प्रमुख तीन पक्ष होते. या पक्षातील नेत्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते आज हे तिन्ही पक्षात सत्तेत आहे. मात्र फक्त थकीत शेतकऱ्यांची पिक कर्ज माफी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी ३१ हजार कोटी रुपये खर्ची पडतील असे जयंत पाटील म्हणत आहेत. मात्र ज्या अटी व निकष लावले आहेत. त्याप्रमाणे सात हजार कोटीच्यावर आकडा नाही. मग ३१ हजार कोटी यांचा आकडा आला कुठून असा सवाल शेट्टी यांनी केला.

तसेच अजित पवारांनी सत्ता द्या तुमचा सातबारा तीन महिन्यात कोरा करणार नाहीतर पवारांची अवलाद सांगणार नाही. असे म्हणले होते. सध्या अजित पवार हेच अर्थमंत्री आहेत. असे देखील शेट्टी यावेळी म्हणाले. आताचे सरकार सध्या राज्यावर कर्जाचा मोठा बोजा आहे. त्यामुळे दोन टप्प्यात कर्जमाफी करतो असे सांगत आहेत. मात्र पहिल्या टप्प्यात सरसकट पिक कर्ज सरकारने माफ केले पाहिजे. यामध्ये कोणताही निकष नसावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या दौऱ्यात बांधावर उभे राहून कर्जमुक्ती करण्याचे सांगितले होते.
मात्र नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्ये सगळी पीक वाहून गेल्याने कर्ज फेडणार कसे ज्वारी, बाजरी, सोयाबीन, उडीद, कांदा, मका, डाळिंब, भाजीपाला, भात पिकांचे मोठे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांची कर्जाची मुदत जून ही २०२० असली तरी कर्ज भरणार कसे यासाठी येणाऱ्या आठ तारखेला ग्रामीण महाराष्ट्र बंद करण्याचे आवाहन आम्ही केले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार सध्या आम्ही करून दाखवले असे बोर्ड गावागावात लावले आहेत. मात्र शेतकरी सरकार व कर्जमाफीवर नाराज आहे. पत्रकारांनी महाविकास आघाडीसोबत राहणार का भाजप कडे जाणार असा सवाल केला असता यावर शेट्टी म्हणाले, आम्ही भाजपच्या विरोधात आहोत. भाजप सरकार हे शेतकरी विरोधी धोरण राबवत आहेत. जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम भाजपने केले आहे. जेएनयु मध्ये विद्यार्थ्यांना मारहाण होते आहे. आम्ही याच्या विरोधात आहोत. शेतकरी संघटना महाआघाडीचा घटक म्हणून काम करत आहोत. मात्र आम्ही त्यांच्याकडे कधीही कोणत्या मंत्रिपदाची किंवा सत्तेमध्ये वाटणी मागितली नव्हती. मात्र त्यांनी प्रसार माध्यमातून आम्ही घटक पक्षांना सरकारमध्ये सामील करून घेणार असे सांगत साधे शपथविधीला देखील निमंत्रण दिले नाही.अशी असहिष्णुता सरकारमधील तिनी पक्षांनी दाखवली यावर आम्ही नाराज आहोत.
मात्र आम्ही भाजपकडे जाणार नाही. आम्ही चळवळीतील कार्यकर्ते आहोत. चळवळी करणे हा आमचे काम आहे. राजकारण करणे हा आमचा धंदा नाही असे शेट्टी म्हणाले. साखर कारखान्यांच्या होणाऱ्या निवडणुकीत बद्दल त्यांना विचारले असता साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमची निर्णायक भूमिका असणार आहे.
चांगल्या लोकांना आमचा पाठिंबा असेल सत्ताधाऱ्यांनी सगळे आलबेल आहे.असे नाही सध्या साखरेला उठाव नाही तसेच शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपीची रक्कम मिळावी यावर आम्ही ठाम आहोत. शेतकरी व उद्योग सध्या अडचणीत आहेत असे शेट्टी यांनी सांगितले. तसेच शेतकर्‍यांना चुकीची वीज बिल आकारणी झाली आहे ती दुरुस्त करावी. शेतकऱ्यांचे विजेचे दर कमी करून मागील वीज बिल माफ करावे, अशी मागणी करणार असल्याची शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा