सरकारच्या ग्रीन सिग्नलशिवाय कोरोनिलची विक्री करता येणार नाही

नवी दिल्ली, दि. २४ जून २०२० : पतंजलीने कोरोना रोगाच्या उपचारासाठी कोरोनिल औषध बनवण्याचा दावा केला आहे, परंतू आयुष मंत्रालयाने बाबा रामदेव यांच्या या औषधावर टांगती तलवार ठेवली आहे. आयुष मंत्रालयाने सध्या या औषधाच्या जाहिरातीवर बंदी घातली असून पतंजलींकडून माहिती मागितली आहे. मात्र मंत्रालयाला माहिती देण्यात आल्याचे पतंजलीच्या वतीने सांगण्यात आले.

या संदर्भात केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे की बाबा रामदेव यांनी कोणत्याही मंत्रालयाची परवानगी घेतल्याशिवाय माध्यमात आपली औषधे जाहीर करू नये. आम्ही त्यांच्याकडे जाब विचारला आहे आणि संपूर्ण प्रकरण टास्क फोर्सकडे पाठवले आहे. तथापि, बाबा रामदेव यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तर त्यांनी दिली आहेत.

पतंजलीने कोणतीही परवानगी घेतली नाही

आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की पतंजलीने दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तसेच हे औषध बनवण्यासाठी त्यांनी कोणती प्रक्रिया व घटक वापरले याची पूर्ण तपासणी टास्क फोर्स करत आहे. त्यानंतर, त्यांना परवानगी दिली जाईल, परंतू प्रोटोकॉलनुसार, औषध बाजारात आणण्यापूर्वी पंतजलीला आयुष मंत्रालयाची परवानगी घेणे गरजेचे होते.

आयुष मंत्रालयही तयार करीत आहे औषध

आयुष मंत्रलयाचे मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की पतंजलीने परवानगी घेणे आवश्यक होते आमचा केवळ तेवढाच आक्षेप आहे. जर या महामारीवर कोणी औषध घेऊन येत असेल तर त्याचे स्वागतच आहे. आयुष मंत्रालयही त्यांच्या औषधांवर काम करत आहे आणि जुलै महिन्यात आयुष मंत्रालय कोरोना व्हायरस वर औषध आणण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा