सारथी संस्थेसाठी खासदार संभाजी राजेंचे उद्यापासून लाक्षणिक उपोषण

पुणे : पुण्यातील सारथी संस्था वाचवण्यासाठी, मराठा समाजातील तरुणांच्या हक्कासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे पहिल्यांदा लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे. अशी माहिती मिळत आहे. नुकतंच याबाबतचे निवेदन त्यांनी दिलं आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती सारथी संस्थेसाठी येत्या ११ जानेवारीला पुण्यात लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
‘सारथी संस्था मी आयुष्यात पहिल्यांदा लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे. गेले अनेक दिवस मी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे. विशेष म्हणजे या संस्थेचे उद्घाटन माझ्या अध्यक्षतेखालीच झाले होते. या संदर्भात काही दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटलो होतो.
त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तात्काळ मार्ग काढण्याचा शब्दही दिला होता.’
त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी मी सारथीच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन, दोन्ही बाजूंची भूमिका समजून घेतली. यानंतर सरकार स्थिरस्थावर होईपर्यंत कुठलाच नवीन आदेश न काढण्याच्या सूचना केल्या होत्या. पण जे पी गुप्ता हे प्रधान सचिव दररोज नवीन आदेश काढून संस्थेला बदनाम करत असल्याचे दिसून येत आहे. त्यांना अशी कोणती घाई झाली आहे, की दररोज आदेश काढत आहेत? असा प्रश्नही संभाजीराजेंनी निवदेनातून विचारला आहे.
आज मला जाणीव झाली आहे की, लोकशाही मार्गाने या मनमानी विरोधात लाक्षणिक उपोषण करण्याशिवाय पर्याय नाही. दि.११ रोजी सारथी कार्यालयाजवळ शेकडो कार्यकर्ते आणि सारथीच्या लाभार्थ्यांसोबत बसणार आहे. असे संभाजी राजेंनी निवदेनात म्हटलं आहे.याबाबत एका वृत्त वाहिनीने वृत्त प्रसिद्ध केले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा