सासवड मधील गुन्हेगारी टोळी हद्दपार

पुरंदर, दि. २२ जून २०२०: पुरंदर तालुक्यातील सासवड येथे संघटीतपणे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या चार जणांच्या टोळीला पुरंदर, भोर, हवेली मधुन हद्दपार कण्यात आले आहे. त्यांना पुरंदर तालुक्यातून बारामती तालुक्यामध्ये सोडून आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सासवड पोलीस यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

सासवड येथील दत्तनगर व खंडोबनगर या भागात सराईतपणे गुन्हेगारी करणाऱ्या टोळीतील १) सुरज प्रकाश आहेर ( २७) धंदा इलेक्ट्रिशन, राहणार सासवड दत्तनगर. २) विकास महादेव देशमुख (३४) धंदा मजुरी, राहणार जेजुरीनका सासवड. ३) राजेश सिताराम निघोल (२२) धंदा मजुरी राहणार खंडोबानगर सासवड. ४) संजय सिताराम निघोल (२७ )धंदा मजुरी राहणार खंडोबानगर सासवड या चौघांना पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आदेशानुसार सासवड, भोर, हवेली या तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

याबाबतचे आदेश देण्यात आले असून त्याची अंमलबजावणीही करण्यात आली आहे. हे चौघे सासवड पोलिस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हेगारी टोळी तयार करून त्याद्वारे अनेक गुन्हे करत होते. त्यामुळे या टोळीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५५ प्रमाणे हद्दपारीचे प्रस्ताव माननीय पोलीस निरीक्षक सासवड पोलिस स्टेशन यांनी पाठवला होता. हा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी मान्य केला असून गुन्हेगारी टोळीला महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ नुसार तीन महिन्यांसाठी पुणे जिल्ह्यातील पुरंदर भोर, हवेली या तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. त्यांना सासवड पोलक बारामती तालुक्यात नेऊन सोडण्यात आले आहे.

त्याचबरोबर पुन्हा पुरंदर मध्ये न येणेबाबात समज देण्यात आली आहे. या कारवाईमध्ये माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, पोलीस अधीक्षक बारामती, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सहाय्यक डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक राहुल घुगे, पोलीस हवालदार राजेश माने, पोलीस नाईक अजित माने, पोलीस शिपाई प्रतीक धिवार यांनी सहभाग घेतला.

सदरच्या व्यक्ती तालुक्यामध्ये इतरत्र कोठेही आढळून आल्यास याबाबतची माहिती सासवड पोलिस स्टेशनला द्यावी असे आवाहन सासवड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा