गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा सासवडच्या दोन पोलीस शिपाई कर्मचाऱ्यांना नाईक पदावर पदोन्नती

सासवडच्या दोन पोलीस शिपाई कर्मचाऱ्यांना नाईक पदावर पदोन्नती

सासवड-पुरंदर : सासवड येथील पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई या पदावर कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना पोलीस नाईक या पदावर नुकतीच पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये पोलीस शिपाई भाऊसाहेब नामदेव खाडे आणि चंद्रकांत नामदेव भोसुरे अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या बद्दल भोर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक डी एस हाके तसेच सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने आणि राहुल घुगे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
भाऊसाहेब खाडे हे २००८ मध्ये पोलीस सेवेत रुजू झाले असून त्यांनी आतापर्यंत देहूरोड, आणि रांजणगाव पोलीस ठाण्यात सेवा केली आहे. तर एक वर्षापासून ते सासवड येथे डीबी पथकात कार्यरत आहेत. त्याच प्रमाणे चंद्रकांत भोसुरे हे माजी सैनिक असून २००८ मध्ये पोलीस दलात भरती झाल्यानंतर आळंदी, व त्यानंतर सासवड येथे गेल्या चार वर्षापासून कार्यरत आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version