पुरंदर (सासवड), ८ डिसेंबर २०२०: नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन सातत्यानं सुरू आहे. आज या आंदोलनाचा बारावा दिवस आहे. कृषी संघटनांनी आज देशभरात भारत बंद चा पुकार केलाय. राज्यात देखील याला ठीक ठिकाणी प्रतिसाद मिळताना दिसतोय. पुरंदर तालुक्यातील सासवड शहर हे मुख्य बाजारपेठेचं गाव असुन आज पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
सासवड व्यापारी संघटनेनं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सासवड शहरातील सर्व दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन केलं होतं. या आव्हानाला पाठींबा देण्यासाठी सर्व व्यापारी वर्गानं आपली दुकानं बंद ठेवली आहेत.
बंद मधुन अत्यावश्यक सेवा, मेडिकल, दवाखाने, रुग्णालये यांना सवलत देण्यात आली होती. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी सांगितलं की, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सासवड शहरातील सर्वच दुकानं बंद ठेवावी असं आवाहन केलं होतं. त्या आव्हानाला चांगला प्रतिसाद व्यापारी वर्गानं दिलाय.
सासवड शहरातील मुख्य बाजारपेठा पुर्ण पणे बंद होत्या. या बंद मध्ये किराणा दुकान, कापड दुकान व इतर छोटी मोठी दुकानं बंद होती
न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे