गोल पोस्ट महाराष्ट्र सासवड पोलिसांची ४७१ वाहन चालकांवर कारवाई

सासवड पोलिसांची ४७१ वाहन चालकांवर कारवाई

पुरंदर, दि.३१ मे २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची वर्दळ थांबावी म्हणून पोलिसांकडून अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. आज सासवड आणि परिसरामध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४७१ वाहनचालकांवर वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून ९९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक यांच्याकडून संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.

त्यानुसार पोलिसांनी आज सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, राजेश माने यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी नाकाबंदी केली होती. त्यामध्ये श्रीनाथ चौक, दिवेघाट, हिवरे रोड फाटा, नारळीची बाग, या विविध पॉईंटवर वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ४७१ वाहनचालकांकडून ९९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर या महिन्याभरात सासवड पोलिसांनी ३२७२ केसेस दाखल केल्या. त्यातून ७,४६,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कामगिरी दरम्यान सासवड पोलिस स्टेशन ट्राफिक पोलीस नाईक ज्योतिबा भोसले यांनी उत्तम कामगिरी केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सासवड परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सहकार्य करावे. अत्यावश्यक गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावे. कामासाठी बाहेर पडताना वाहतुकीचे नियम पाळावेत. असे अावाहन पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
आजच्या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी भोर-पुरंदर यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस.हाके, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने, पोलीस शिपाई रमेश कर्चे, निलेश जाधव, दत्ता जाधव, कैलास सरक, कांतोडे पोलीस शिपाई तसेच होमगार्ड व ट्रॅफिक वॉर्डन यांनी सहभाग घेतला.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version