सासवड येथे रंगला संत सोपानकाका संजीवन समाधी सोहळा

35

सासवड : संत ज्ञानेश्वर महाराज यांचे धाकटे बंधू संतश्रेष्ठ सोपानदेव महाराजांनी सासवड येथे मार्गशीष महिन्यात संजीवनी समाधी घेतली. या निमित्ताने सासवड येथील सोपानकाका मंदिरामध्ये १९ ते २५ डिसेंबर या कालावधी मध्ये संजीवनी समाधी सोहळा साजरा केला जातो .
उद्या दि.२४ डिसेंबर हा सोपानदेवांचा समाधीचा मुख्य दिवस आहे. सासवड येथे उद्या दुपारी १२ वाजता पुष्पवृष्टी व समाधी वर्णन किर्तन होणार आहे. तसेच समाधी स्थळावर पवमाण अभिषेक व पादूकांची पालखीतून नगरप्रदक्षिणा होणार आहे. सात ही दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यासाठी राज्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. हरिपाठ, प्रवचन, कीर्तने , अभंग आदी धार्मिक कार्यक्रमांचे आठवडाभर आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध दिंड्याचा सातही दिवस जागर करण्यात येतो. २५ डिसेंबरला या सोहळ्याचा शेवटचा दिवस असणार आहे. सोहळ्याची सांगता प्रक्षाळ पुजेने होणार आहे. भाविकांना सोपान काकांचा समाधीस गरम पाण्याने स्नान घालता येणार आहे .

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा