गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा सातारा मार्गावर खड्ड्यांमध्ये वाढ

सातारा मार्गावर खड्ड्यांमध्ये वाढ

पुणे: परतीच्या जोरदार पावसामुळे रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सातारा रस्ता बीआरटी मार्गावरील कात्रज ते पद्मावती परिसरात या परतीच्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली दिसून आली आहे.
रस्त्यावरील साठलेले पाणी यामुळे खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. या सर्वांमुळे वाहनचालकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पद्मावती रस्त्यावर जागोजागी खड्डे आहेत. हे खड्डे याआधी नगरपालिकेने बुजवले होते परंतु जोरदार पावसामुळे हे खड्डे पुन्हा वर आले आहेत. खड्ड्यांचे काम तात्पुरत्या स्वरूपाचे न करता कायमस्वरूपी करावे अशी लोकांची मागणी आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version