सतत मुसळधार पाऊस, ढगाळ वातावरण व धुक्याच्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील सर्वाधिक कांदा पीक घेणाऱ्या सावरगाव तळ व परिसरातील सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्रातील कांदा नुकसानीच्या सावटाखाली आहे.
तालुक्याच्या पठार भागातील सावरगाव तळ हे गाव मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकवणारे गाव असून जवळपास प्रत्येक शेतकऱ्याकडे पाण्याच्या सोयीसाठी आलेले शेततळे, प्रवरा नदी वरून केलेले सायफन तसेच यावर्षी गाव व परिसरातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे गावात शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा, टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, डाळिंब केली आहेत, मात्र गेल्या दहा दिवसापासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने जमिनीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.