सतेज पाटलांचा कोल्हापुरात मोठा प्लॅन

कोल्हापूर, ९ ऑक्टोंबर २०२२ : राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सध्या भारत जोडो यात्रा सुरू असताना. ही यात्रा आज कर्नाटकमध्ये आहे. यात्रा ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारीतून सुरु झाली असून जम्मू आणि काश्मीरमध्ये तिची समाप्ती होणार आहे. एकूण ३५७० किमीचा प्रवास करून १२ राज्यांमधून ही यात्रा जाईल. राहुल गांधी आणि यांचे ११९ सहकारी दररोज ७ तासात २० ते २२ किलो मीटर अंतर चालतात तर संपूर्ण दौरा पूर्ण होण्यासाठी तब्बल १५० दिवस लागणारं आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबरला नांदेडमध्ये प्रवेश करणार आहे. महाराष्ट्रात १६ दिवसांमध्ये ३८३ किमीचा प्रवास करणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून बेरोजगारी आणि ढासळलेली अर्थव्यवस्थेवरून भाजपवर हल्लाबोल करत आहेत.

तर भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर माजी गृहराज्यमंत्री काँग्रेस आमदार कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील सुध्दा आता कोल्हापूर आणि इचलकरंजीसाठी मैदानात उतरले आहेत. सतेज पाटलांच्या संकल्पनेतून कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये १०० दिवस १२३९ गावांमध्ये १३ नगरपालिका आणि नगरपंचायतील सर्व क्षेत्रात १३ एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून भारत जोडो यात्रा लाईव्ह दाखवण्याचा भारतातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जात आहे.

तर भारत जोडो यात्रा’ मध्ये महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांचा समावेश आहे. तर हा नवीन उपक्रम राबवल्या मुळे याचा मोठा प्रभाव कोल्हापूरकरांवर पडू शकतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा