इराणी शास्त्रज्ञ फखरीजादेह यांच्या हत्येत सॅटॅलाइट गनचा केला गेला वापर, या देशावर संशय

12

तेहरान, ९ डिसेंबर २०२०: इराणी वैज्ञानिक मोहसीन फखरीजादेह यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. ज्या प्रकारे हत्येची ही घटना घडली, ती खरोखरच धक्कादायक आहे. फखरीजादेह यांच्या हत्या मध्ये अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरले गेले होते जे सर्वांना आश्चर्यात पाडणारे आहे किंवा एखाद्या हॉलीवूड मधील चित्रपटाप्रमाणे वाटणारे आहे. धक्कादायक बाब म्हणजे फखरीजादेह यांना ठार मारण्यासाठी एका ट्रकवर बंदूक ठेवण्यात आली होती. बंदुकीच्या साहाय्याने त्यांची हत्या करण्यात आली. पण, यात धक्कादायक बाब अशी आहे की, बंदुकीचा ट्रिगर दाबण्यासाठी प्रत्यक्ष तिथे कोणीही उपस्थित नव्हते. त्याऐवजी पृथ्वीपासून लाखो किलोमीटर अंतरावर आकाशात तरंगणार्‍या उपग्रहाचा इशारा मिळताच ह्या बंदुकीतून फखरीजादेह यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. अर्थात अतिशय उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून ही बंदूक लाखो किलोमीटर लांब असणाऱ्या उपग्रहाशी जोडली गेली होती.

यापूर्वी इराणी शास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह यांच्या हत्येविषयी स्वतंत्रपणे अटकळ बांधली जात होती. काही ठिकाणी अशी बातमी होती की फखरीजादेह यांच्या ताफ्यावर हल्ला करून त्यांना ठार मारण्यात आले, तर काही ठिकाणी असे सांगितले जात आहे की त्यांना ट्रक वर बसलेल्या एका व्यक्तीने गोळ्या झाडून ठार मारले. तथापि, आता अधिकृतपणे इस्लामिक रेव्होल्यूशन गार्ड्स कोर्प्सचे प्रवक्ते ब्रिगेडिअर जनरल रमजान शरीफ यांनी दावा केला आहे की, फखरीजादेह यांची हत्या उपग्रहाद्वारे चालवलेल्या शस्त्राने केली गेली.

ही गोष्ट सर्वांनाच आश्चर्यात टाकत आहे की, एका सॅटेलाईट द्वारे नियंत्रित केले गेलेले उपकरण एवढा अचूक निशाणा कसा साधू शकते. कारण, एका कार मधून जाणारी व्यक्ती बंदुकीच्या साहाय्याने लक्ष करणं हे मानवाला देखील कठीण जातं जे एका सॅटेलाइट च्या माध्यमातून घडवून आणण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा फखरीजादेह ठार झालेल्या त्याच कारमध्ये त्यांची पत्नी देखील अगदी काही इंचाच्या अंतरावर बसलेली होती. परंतु, या हल्ल्यात त्यांच्या पत्नीला कोणतीही इजा झाली नाही इतका अचूक निशाणा लावण्यात आला होता.

असे सांगितले जात आहे की हल्ल्यादरम्यान, फखरीजादेह याच्यावर तेरा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या आणि या तेरा गोळ्या पैकी एकही गोळी एक सेंटीमीटर च्या अंतराने देखील इकडे तिकडे झाली नाही इतका अचूक निशाणा लावण्यात आला होता. हत्येमध्ये वापरलेले हत्यार इतके धोकादायक होते की तेथून पळून जाण्यासही वाव नव्हता, याचा अंदाज बांधणे कठीण नाही. एजन्सीच्या अहवालानुसार, फखरीजादेह यांच्या हत्येमध्ये नुकतीच तयार करण्यात आलेले बंदूक स्मॅश हॉपरचा वापर करण्यात आला होता.

आज सर्वत्रच स्मॅश हॉपर गनची चर्चा सुरू आहेत. कारण ही बंदुकाच मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाने सज्ज आहे. ही बंदूक केवळ स्वयंचलित नसून रिमोट कंट्रोलद्वारे देखील ऑपरेट केली जाऊ शकते. इतकेच नव्हे तर ही बंदूक लक्ष स्वताच आयडेंटिफाय करते व लॉक देखील करते. या बंदुकी पासून बुलेटप्रूफ वाहनातूनही सुटणे अवघड आहे. काही दिवसांपूर्वीच इस्त्रायली कंपनीने या मॅन पोर्टेबल ऑटोमॅटिक गन ला लॉन्च केले होते आणि हेच कारण आहे की आज इस्राईल वर या खुनाचे आरोप लावले जात आहेत. इस्त्रायली कंपनीचा दावा आहे की, ही बंदूक आपोआप लक्ष्य स्कॅन करुन लक्ष्य लॉक करू शकते. ज्यानंतर दूर बसलेला ऑपरेटर जेव्हा त्याला पाहिजे तेव्हा टॅब्लेट सारख्या वायरलेस डिव्हाइसमधून फायरिंग करू शकतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे