गोल पोस्ट महाराष्ट्र भाजपच्या सत्ता स्थापनेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

भाजपच्या सत्ता स्थापनेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुंबई : राजभवनावर झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सकाळी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक झाली. त्यावेळीच कायदेशीर मार्गाने लढाई लढणार असल्याचे तिन्ही पक्षांनी स्पष्ट केले होते.

आता ही लढाई न्यायालयात पोहोचली आहे. दरम्यान यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सुरु असलेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे ४२ आमदार उपस्थित असल्याची माहिती एएनआयने दिले आहे. महाराष्ट्रातील हे राजकारण नेमके कुठल्या दिशेने जाणार ते लवकरच स्पष्ट होईल.

error: Content is protected !!
Exit mobile version