सत्तास्थापनेत मुख्यमंत्री एकटे पडले आहेत का?

35

पुणे: विधानसभेचे निकाल लागून नऊ दिवस झाले आहे तरी युतीमध्ये बेबनाव आहे. युतीचा तिढा सोडवण्यासाठी यावेळी भाजपकडे नेत्यांची फळी नसल्याचे दिसून येत आहे. २०१४ सली युतीची सत्ता स्थापन करताना भाजप सोबत एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांसारखे नेते होते पंकजा मुंडे यांचा पराभव धनंजय मुंडे यांच्याकडून झाला आहे ही गोष्ट ठीक आहे परंतु यावेळी एकनाथ खडसे व तावडे यांची तिकिटे कापल्या मुळे भाजप कडे आता हा तिढा सोडवण्यासाठी नेत्यांची मजबूत फळी नसल्याचे दिसून येत आहे. अधून-मधून सुधीर मुनगुंटीवार माध्यमांसमोर येत आहेत व भाजपची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. युतीच्या सत्तास्थापनेच्या या चर्चेत मुख्यमंत्री एकटे पडले आहेत का असा प्रश्न निर्माण होत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा