सत्ते पलीकडचे राजकारण

सध्या राज्यात सत्ता स्थापनेची समीकरण जोडण्याची खलबत सर्वच पक्षाची सुरू आहेत. त्याच एकही पक्षाला बहुमत सिद्ध करता अन आल्याने शेवटी राज्यपालांना राष्ट्रपती राजवट लावावी लागली. परंतु एवढे सगळे असताना भाजपने शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद का नाही दिलं यावर कोणी विचार केला का?
असा कोणता मुद्दा होता, काँग्रेसचा ज्यामुळे काँग्रेस वेळेत शिवसेनेला पाठिंबा नाही देऊ शकली? असं काय झालं असेल की शिवसेनेला २ ते ३ दिवसांची मुदत का नसेल भेटली? असे काय झाले असेल की सेनेच्या प्रेस कॉन्फरन्सनंतर लगेचच राज्यपालांनी राष्ट्रवादीला भेटण्यास बोलवले? असे काय घडले असेल की वेळ संपण्याआधी राष्ट्रपती राजवट लागू झाली?
अखेर शिवसेना “ब्लाइंड गेम” खेळत असल्याचे दिसत आहे. म्हणजेच मराठी भाषेत आंधळी कोशिंबीर. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. जे शिवसेनेच्या विचारसरणीच्या विरुध्द दिशेचे पक्ष आहेत. एका बाजूला पवार म्हणत आहे की आम्ही विरोधी पक्षात बसणार तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस जो शिवसेनेच्या विचारसरणीच्या विरूध्द विचारसरणी असलेला पक्ष. मग नक्की शिवसेना सध्या काय करण्याचा प्रयत्न करत आहे. पाठिंब्यासाठी इकडे पळ तिकडे पळ असे शिवसेनेचे चालू आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पातळीवरील पक्ष आहे. विचारपूर्वक निर्णय घेणारा पक्ष आहे. सत्तेसाठी भिन्न विचारसरणी सोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस सहसा तयार होणार नाही.
शिवसेनेच्या अशा वागण्याला राजकारणातील अपरिपक्वता म्हणता येईल का? मुख्यमंत्री होणे, राज्याचा गाडा हकालने हे शिवसेनेला जड जाणार आहे. कारण केंद्रात भाजपा असणार आहे. राहिला पुढचा प्रश्न जरी सत्ता स्थापन झाली तरी राज्यात ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या समस्या, राज्यावर सुरवातीलाच कर्जाचा भरमसाठ बोजा आहे. बेरोजगारी, रस्त्यांची समस्या अश्या अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. कोणतेही नियोजन नाही आणि समोर एवढ्या समस्या, केंद्रात विरोधी सरकार ज्यांची तुम्ही युती तोडली हे शिवसेनेला सोप्पे नसणार. कारण या सर्व समस्येच्या निवारणासाठी केंद्रात हात पसरावे लागणार आहे.
सत्ता चालवण्याचा शिवसेनेला अनुभव कमी आहे. सरकार चालवण्यासाठी सध्या महाराष्ट्रात भाजपा आणि आघाडी दोन पक्ष सक्षम आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडे केंद्रात सत्ता जरी नसली तरी त्यांच्याकडे ही पदे भूषवलेली नेते मंडळी निश्चितच आहेत. त्यांचा अनुभव मोठा आहे.
इथे एक गोष्ट ही विसरता येणार नाही की, भाजपकडे बहुमत असताना भाजप विरोधी पक्षात असणार नाही. मुंबई सारखी आर्थिक राजधानी असलेले राज्य भाजप सहसा सोडणारे नाही. त्यात अमित शाह सुद्धा शांत असणे हे वादळापूर्वीची शांतता असू शकते. “मी पुन्हा येईल” हे सत्य ठरते का हे काही दिवसात समजेल.

– ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा