पुणे, २७ ऑक्टोबर २०२०: दरवर्षी भ्रष्टाचारविरोधी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी दिनांक २७/१०/२०२० ते २/११/२०२० या कालावधीमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्याचे केंद्रीय दक्षता आयोग यांनी ठरविले आहे.
त्यानुसार आज पुणे महानगरपालिका मुख्य भवनातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ भ्रष्टाचार निर्मूलन ‘सत्यनिष्ठा प्रतिज्ञा’ शपथ कार्यक्रमाचे आयोजन पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अधिकारी व कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलन ‘सत्यनिष्ठा प्रतिज्ञा’ शपथ देण्यात आली. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शपथ घेतली व त्यांच्या पाठोपाठ उपमहापौर सरस्वती शेंडगे व मा. आयुक्त विक्रमकुमार यांनी शपथ घेतली.
याप्रसंगी उपमहापौर सौ. सरस्वतीताई शेंडगे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, नगरसचिव शिवाजी दौंडकर, उपायुक्त सुनिल इंदलकर, श्रीनिवास कंदुल, श्रीमती मंजुषा इधाटे, श्रीनिवास बोनाला तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे