इस्लामाबाद, २७ डिसेंबर २०२२ : सौदी अरेबियाने सोमवारी पाकिस्तानमधील आपल्या नागरिकांना अनावश्यक हालचाली थांबविण्याचा सल्ला दिला आहे. दक्षिण आशियाई देश रविवारी अनेक बॉंबस्फोटांनी हादरल्यानंतर त्यांना प्रत्येक संभाव्य मार्गाने सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला. जारी केलेल्या ॲडव्हायझरीमध्ये देशात राहणाऱ्या नागरिकांना शहरातील प्रवास मर्यादित करण्याचे आवाहन केले. दहशतवादी हल्ल्याच्या संभाव्य धोक्यामुळे इस्लामाबादमधील पंचतारांकित हॉटेलला भेट देणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधील दोन पवित्र मशिदींच्या कस्टोडियनच्या दूतावासाने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या आणि भेट देणाऱ्या सर्व नागरिकांना सावधगिरी बाळगण्याची आणि आवश्यकतेशिवाय घराबाहेर न पडण्याची गरज आहे,” असे सांगितले आहे. राजधानी इस्लामाबादने सुरक्षा सतर्कता सर्वोच्च पातळीवर वाढवली आहे. यूएस सरकारच्या ॲडव्हायझरीमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. देश दहशतवादाच्या ताज्या लाटेशी लढत असताना अनेक लष्करी अधिकारी आणि नागरिकांनी प्राण गमावले. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये रविवारी किमान सात बॉंबस्फोट झाले ज्यात लष्कराचे ५ जवान ठार, तर १९ जण जखमी झाले.
बलुचिस्तानचे मुख्यमंत्री अब्दुल कुद्दुस बिझेन्जो यांनी दिलेल्या निवेदनानुसार, पाकिस्तानच्या क्वेट्टामधील सब्जल रोडवर ग्रेनेड स्फोटात, कमीत कमी चारजण जखमी झाले आहेत. दरम्यान, उत्तर वझिरीस्तान आदिवासी जिल्ह्यातील मीर अली मार्केटमध्ये तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानचा ध्वज एका विद्युत तोरणावर फडकवण्यात आला आणि तो खाली उतरवला गेला. ‘टीटीपी’ची तालिबानशी युती आहे, ज्यांनी गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये शेजारच्या अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली होती. नोव्हेंबरमध्ये अफगाण तालिबानच्या मध्यस्थीने सरकारसोबत युद्धविराम संपल्याची घोषणा केल्यापासून कट्टरपंथी इस्लामिक संघटनेने हल्ले वाढविले आहेत. गेल्या महिन्यात, ‘टीटीपी’ने सरकारसह एक अस्थिर युद्धविराम मागे घेतला आणि लढाऊंना देशभरात हल्ले करण्याचे आदेश दिले. २०२२ मध्ये ‘टीटीपी’ने अनेक हल्ल्यांमध्ये १५० हून अधिक पाकिस्तानी मारले. युद्धविराम संपल्यापासून ‘टीटीपी’ने ३३ हल्ले केले ज्यात ३५ सुरक्षा कर्मचारी मारले गेले, असा दावा ‘टीटीपी’ने केला आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड