रिलायन्स रिटेलमध्ये सौदी पीआयएफ करणार १.३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

मुंबई, ६ नोव्हेंबर २०२०: रिलायन्स इंडस्ट्रीजची किरकोळ शाखा रिलायन्स रिटेलमध्ये सौदी अरेबियाची पब्लिक इनवेस्टमेंट फंड (पीआयएफ) १.३ अब्ज डॉलर्स (९,५५५ कोटी रुपये) गुंतवणूक करेल. या रकमेसह ते रिलायन्स रिटेलमध्ये २.०४ टक्के हिस्सा खरेदी करतील. रिलायन्स रिटेलने गुरुवारी ही माहिती दिली.

या करारासाठी रिलायन्स रिटेलचे मूल्य ४,५८७ लाख कोटी रुपये ठेवण्यात आले आहे. यापूर्वी पीआयएफने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये २.३२ टक्के हिस्सा खरेदी केला होता. जिओ रिलायन्स इंडस्ट्रीजची टेलिकॉम युनिट आहे. या करारापूर्वी रिलायन्स रिटेलने जगातील अनेक बड्या परदेशी गुंतवणूकदारांकडून ३७,७१० कोटी रुपये जमा केले आहेत. यामध्ये सिल्व्हर लेक, केकेआर, जनरल अटलांटिक, मुबाडाला, जीआयसी, टीपीजी आणि एडीआयएचा समावेश आहे. रिलायन्स रिटेलने या गुंतवणूकदारांकडून ४ आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत ही रक्कम जमा केली आहे.

रिलायन्स रिटेल ही प्रत्यक्षात आरआरव्हीएलची सहाय्यक कंपनी आहे. आरआरव्हीएल देशातील सर्वात मोठी रिटेल कंपनी बनली आहे. ही कंपनी देशभरात १२,००० स्टोअरद्वारे किरकोळ व्यवसाय करते. या कराराच्या घोषणेपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स गुरुवारी २.१८ टक्क्यांनी वाढून १,९५५.१० रुपयांवर बंद झाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा