सौरभ गांगुली बीसीसीआय अध्यक्ष पद सोडण्याच्या तयारीत

दिल्ली, ८ ऑक्टोबर २०२२ : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यकारणीसाठी येत्या १८ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयची गुरुवारी नवी दिल्ली येथे मीटिंग पार पडली, या मीटिंगमध्ये अध्यक्ष सौरभ गांगुली, सचिव जय शहा, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, एन श्रीनिवासन, कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाल, आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, त्याचबरोबर माजी सचिव निरंजन शहा इत्यादी सहभागी झाले होते.

काही मीडिया रिपोर्ट नुसार बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली पुन्हा अध्यक्ष बनण्याच्या मूडमध्ये नाही, ते यंदाची बीसीसीआय अध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार नसल्याची माहिती समोर येत आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार सौरव गांगुली यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलच्याअध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे सौरभ गांगुली पुन्हा अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाहीत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १९८३ च्या विश्वचषक चॅम्पियन संघातील सदस्य पैकी एक व सध्याच्या कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होऊ शकतात.

दरम्यान बीसीसीआयच्या सगळ्या पदांसाठी ११ आणि १२ तारखेला अर्ज दाखल करू शकतात. १३ ऑक्टोबरला कागदपत्रांची छाननी करण्यात येणार आहे, आणि १४ ऑक्टोबरला अर्ज मागे घेऊ शकतो, त्यानंतर दोन पेक्षा जास्त दावेदार असल्यास १८ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा