नवी दिल्ली, दि. २८ मे २०२०: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी सकाळी श्रद्धांजली वाहिली. पीएम मोदी यांनी विनायक सावरकर यांच्यावर ट्विट करून स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची आठवण केली. या दरम्यान पीएम मोदींनी एक व्हिडिओही ट्विट केला असून त्यात त्यांनी विनायक सावरकरांचा उल्लेख केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, ‘वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो, त्यांच्या शौर्य, स्वातंत्र्य चळवळीत योगदान आणि हजारो लोकांना प्रोत्साहित केल्याबद्दल आम्ही त्यांना नमन करतो.’ पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही सावरकरांना श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त भारतीय जनता पक्षाच्या ट्विटर हँडलवर अनेक भाजप नेत्यांसह केंद्रीय मंत्र्यांनी ट्वीट केले आणि यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
२७ मे, १८८३ रोजी मुंबई येथे जन्मलेले सावरकर एक क्रांतिकारक, लेखक, अधिवक्ता आणि हिंदुत्वाच्या विचारधारेचे समर्थक होते. चळवळीच्या वेळी इंग्रजांनी त्यांना कालापानी ची शिक्षा दिली. विनायक दामोदर सावरकर यांचे २६ फेब्रुवारी १९६६ रोजी निधन झाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी