सावरकर यांचे देशप्रेम हे कडवे होते : भैय्यासाहेब खाटपे

पुरंदर, दि.२८ मे २०२० : ‘वीर सावरकर दुनियेतील एकमेव असे स्वातंत्र्य-योद्धा होते ज्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. ती त्यांनी पूर्ण केली आणि पुन्हा राष्ट्र जीवनात सक्रिय झाले. सावरकर हे प्रथम असे भारतीय विद्यार्थी होते. ज्यांनी इंग्लंडच्या राजा प्रती निष्ठावान असल्याची शपथ घेण्यास नकार दिला होता. परिणाम स्वरूप त्यांना वकालत करता आली नाही. यावरून त्यांचे देशप्रेम किती कडवे होते हे सिद्ध होते असे मत सामाजिक कार्यकर्ते भय्यासाहेब खाटपे यांनी व्यक केले.

नीरा (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३७ व्या जयंतीनिमित्त प्रतीमा पुजन करण्यात आले. यावेळी खाटपे बोलत होते.

यावेळी नीरेचे उपसरपंच विजय शिंदे सदस्य अनिल चव्हाण, पुरंदर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राहुल शिंदे, भरत निगडे, गणिभाई सय्यद, अप्पा लकडे, बाळासाहेब गार्डी, सुनिल पाटोळे, कांता राखपसरे आदींच्या उपस्थितीत पुष्पहर अर्पण करून सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर कोणती खबरदारी ग्रामपंचायत घेत आहे याची माहिती उपसरपंच विजय शिंदे यांनी दिली. अनिल चव्हाण यांनी आभार मानले.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा