सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून पदवीधर आणि पदव्युत्तरचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय

पुणे, दि.२५ मे २०२०: यंदाच्या वर्षीपासून सावित्री बाई फुले विद्यापीठाने पदवीधर आणि पदव्युत्तरमधील द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या वर्षीपासून विद्यार्थ्यांचे ‘चाॅईस बेसड क्रेडिट सिस्टम’ नुसार मूल्यमापन केले जाणार आहे. अशी माहिती कुलगुरू नितीन करमळकर यांच्या सोबत झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर आणि विद्यापीठ अधिकाऱ्यांची शनिवारी( दि.२३) रोजी कुरुगुरूंच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन, मानववंशशास्त्र आणि चार विद्याशाखांचे प्रस्ताव सादर करण्यात आले.

ज्या प्रमाणे विद्यापीठ प्रशासनाने मागील वर्षी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘क्रेडीट प्रणाली’ लागू केली होती. तशीच यंदाच्या वर्षी पासूनही ती लागू करण्यात येणार आहे.

त्यामुळे बीए, बीकॉम, बीएससी, एमए, एमकॉम, एमएससी, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, एमबीए, फार्मसी, सर्व पदवी व पदव्युत्तर द्वितीय वर्षाचे अभ्यासक्रम असणार आहेत. या नवीन बदलासह, आठ ते दहा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

याबाबत विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा, तसेच त्यांनी नोकरी करण्यायोग्य व्हावे आणि त्यांच्यात नवीन कल्पना विकसित व्हाव्यात, या उद्देशाने अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नाविन्य आणण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना भविष्यात मोलाचा ठरणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा