जागतिक क्रमवारीत सुधारणा केलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला राष्ट्रीय संस्थात्मक रैंकिंग फ्रेमवर्क (NIRF) मध्ये मोठा धक्का बसला आहे. पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे विद्यापीठाची कामगिरी घसरल्याचे समोर आले आहे. केंद्रीय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या NIRF २०२५ नुसार, पुणे विद्यापीठाला ‘ओव्हर ऑल’ रँकिंगमध्ये ९१ वा, ‘युनिव्हर्सिटी’ रँकिंगमध्ये ५६ वा, तर ‘स्टेट युनिव्हर्सिटी’ रँकिंगमध्ये ११ वा क्रमांक मिळाला आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत ही मोठी घसरण मानली जात आहे. विद्यापीठाने या घसरणीचे मुख्य कारण प्राध्यापकांची कमतरता असल्याचे म्हटले आहे. गेल्या दोन वर्षांत अनेक प्राध्यापक निवृत्त झाल्यामुळे विद्यार्थी-शिक्षक यांचे प्रमाण कमी झाले, ज्यामुळे संशोधनावरही परिणाम झाला.
यावर उपाय म्हणून प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू असल्याचे विद्यापीठाने सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे












































