सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम

पुणे ९ ऑगस्ट २०२४ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या औचित्याने कुलगुरु प्रा. डॉ. डॉ. सुरेश गोसावी, प्र. कुलगुरु प्रा.डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी वित्त व लेखा अधिकारी चारुशीला गायके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.महेश काकडे, संचालक व विभागप्रमुख डॉ. विलास आढाव, अधिसभा सदस्य प्रा.डॉ. राजेंद्र घोडे आदी मान्यवर तसेच शैक्षणिक व प्रशासकिय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक,शिक्षकेतर सेवक, विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी अधिसभा सदस्य प्रा. डॉ. राजेंद्र घोडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित मराठीचे सुप्रसिद्ध लेखक डॉ. यशवंत मनोहर यांचे “मी सावित्री, सावित्री ज्योतिराव फुले” या पुस्तकाचे, हिंदी भाषेत “मैं सावित्री” म्हणून अनुवादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरु प्रा. डॉ. गोसावी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनीधी : जयश्री बोकील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा