सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर, ७२७३ विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे ५ ऑगस्ट २०२४ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळी ५ वाजता हा निकाल विद्यापीठाच्या https://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. या परीक्षेची अंतिम उत्तरतालीका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लगेचच त्यांचे सेट प्रमाणपत्र वरील संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्यावतीने ३९ व्या (सेट) राज्य पात्रता परीक्षेचे दि. ७ एप्रिल रोजी १७ शहरांमधील विविध महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत महाराष्ट्र आणि गोव्यातील एक लाख ९ हजार २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील ७२७३ विद्यार्थ्यांनी पात्र ठरले असून ६.६६ टक्के निकाल लागला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : जयश्री बोकील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा