सावित्रीमाई फुले स्त्री उध्दाराच्या महामेरु – नगरसेविका राजश्री मखरे

इंदापूर, ३ जानेवारी २०२१: इंदापूर शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर मधील जेतवन बुद्ध विहारात रविवारी ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

‘शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणं गरजेचं आहे, स्रियांचा स्वविश्वास वाढविणं गरजेचं आहे, हे सावित्रीमाईंनी ओळखलं आणि काही क्रूर रुढी परंपरांना आळा घातला म्हणूनच क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले या स्री उध्दाराच्या महामेरु आहेत ‘ असं प्रतिपादन नगरसेविका राजश्री मखरे यांनी केलं.

सुरुवातीला नगरसेविका तथा महिला विकास व बालकल्याण समिती सभापती राजश्री अशोक मखरे यांचे हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तर सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या हौसाबाई व उषा मखरे यांनी पुष्पहार अर्पण केला. प्रा. बाळासाहेब मखरे यांनी दिप प्रज्वलन करून गौतम बुद्धांच्या मुर्तीस पुष्प अर्पण केली. पंचशील व त्रिशरण घेऊन धम्मपुजा करण्यात आली. अॅड. किरण लोंढे यांनी जयंती निमित्त समस्त महिलांना शुभेच्छा दिल्या तर कुमारी विवेका मखरे हिने सावित्रीमाई फुले यांचा जीवनपट सांगितला.

याप्रसंगी प्रा.बाळासाहेब मखरे, प्रा.अशोक मखरे, अॅड. किरण लोंढे, पी.आर.पी.चे शहराध्यक्ष शिवाजी मखरे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग युवक तालुकाध्यक्ष शुभम मखरे, मुकादम बापुराव मखरे, विशाल मखरे, अगंद मखरे, राजू मखरे, भालचंद्र लंकेश्वर, नामदेव गायकवाड, पिंटू लांडगे, संभाजी मखरे, अनार्य मखरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. हौसाबाई मखरे, उषा मखरे, पद्मिनी मखरे, मीना मखरे, सुनिता अवघडे, उज्वला मखरे, वैशाली साबळे, शितल गाडे, शैला मखरे, ज्योती साबळे, विवेका मखरे, कोयल मिसाळ, सम्यका मखरे, अनुष्का काकडे, यशस्वी मखरे इत्यादींची उपस्थिती होती. सुत्रसंचालन प्रा. बाळासाहेब मखरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. अशोक मखरे यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा