सावकारीच्या पैशासाठी तरुणाचे अपहरण करत मारहाण

बारामती, दि.२ जून २०२० : व्याजाने दिलेल्या पैशापोटी युवकाचे अपहरण करत त्याला मारहाण केल्याची घटना बारामतीत घडली. याप्रकरणी चौघा जणांविरोधात अपहरणासह, धमकावणे व सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रताप रमेश जाधव (रा. श्रीरामनगर, ता. बारामती) व अन्य तिघांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

याप्रकरणी राहूल हनुमंत घाडगे (रा. तांदूळवाडी, ता. बारामती) या युवकाने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दि. ५ मार्च रोजी ही घटना घडली. परंतु याप्रकरणी १ जून रोजी फिर्याद देण्यात आली आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार २०१४ साली फिर्यादी यांनी आरोपींकडून २ लाख व २०१८ साली २ लाख असे ४ लाख रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात १७ लाख रुपये परत केले. परंतु एका महिन्याचे व्याज भरले नाही. या कारणावरून दि.५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पाटस रस्त्यावरून फिर्यादी जात प्रताप जाधव व त्यांचे अन्य सहकारी तेथे आले. त्यांनी फिर्यादीला गाडीत बसण्यास सांगितले. फिर्यादीने नकार दिला असता त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

आरोपींपैकी एकाने त्यांच्या पोटाला चाकू लावत जबरदस्तीने वाहनात बसवून त्यांना पाणी साठवण तलावाच्या आतील बाजूला नेत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा