१४ ते १८ डिसेंबर दरम्यान सवाई गंधर्व महोत्सव पुण्यात होणार आयोजित

पुणे, दिनांक ८ ऑक्टोबर २०२२ : अभिजात संगीत क्षेत्रामध्ये संपूर्ण जगामध्ये नावलौकिक मिळवलेल्या, सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचे १४ ते १८ डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजन करण्यात येणार आहे. सदर महोत्सव पुण्यातील मुकुंद नगर येथे शेठ दगडूराम कटारिया प्रशालेच्या प्रांगणात होणार असल्याचे आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.

दरवर्षी आर्य संगीत प्रसारक मंडळाकडून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीचा हा ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आहे. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्ष हा महोत्सव झाला नाही. त्यामुळे यावर्षीच्या महोत्सवामध्ये स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी, यांची शताब्दी साजरी करण्यात येणार आहे. कोरोना कालखंडानंतर प्रथमच हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. त्यामुळे संगीत प्रेमींसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा