बारामती, दि. २४ जून २०२० : काल बुधवार (दि.२३) जून रोजी स्टेट बँक आँफ इंडिया बारामती शाखा येथे खातेदारांना होणारा नाहक त्रास व जेष्ठ नागरिकांना बँके मध्ये होणारी गैरसोय याबद्दल बारामती शहर काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले
बारामती शहरातील भिगवण रोड वरील स्टेट बँक ऑफ इंडिया येथील शाखेत शहर काँग्रेसच्या पाधिका-यांनी भेट देत येथील शाखाधिकारी यांना बँकेतील काही त्रुटी असल्याचे व याचा वृद्ध व खातेदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे निवेदन देण्यात आले यामध्ये मागील वर्षापर्यंत ग्राहकांना तत्पर सेवा मिळत होती मात्र मागील काही महिन्यांपासून बँकेत एकदम संथ गतीने कामकाज सुरू असल्याचे , तसेच जेष्ठ नागरिकांसाठी राखीव खिडकी असावी असे रिझर्व्ह बँकेचे निर्देश असताना देखील बँकेत तशी कोणतीही व्यवस्था नसल्याचे निदर्शनात आले. अनेक वेळा वृद्ध नागरिकांना रांगेत उभे राहिल्यावर चक्कर आल्याचे प्रकार घडले आहेत. तरी आपल्या बँकेची सेवा तत्पर करावी असे निवेदन शाखाधिका-यांना देण्यात आले आहे.
यावेळी शाखाधिकारी यांनी हे निवेदन मान्य करून बँकेतील गैरसोय दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. या वेळी बारामती शहर काँग्रेस अध्यक्ष अँड अशोक इंगुले, प्रदेश प्रतिनिधी अॅड आकाश मोरे, माजी तालुका अध्यक्ष बाळासाहेब देवकाते, जिल्हा युवक काँग्रेस विरधवल गाडे, युवक अध्यक्ष वैभव बुरूंगले, राजु ठोंबरे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव