पुणे, २ जुलै २०२३: देशातील सर्वात मोठी आणि सर्वात विश्वासार्ह स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी डिजिटल सेवेत वेळोवेळी बदल करत असते. एसबीआय ने रविवारी YONO अॅपमध्ये बदल केले आहेत. अॅपमध्ये बदल केल्यानंतर, लोक YONO वरून थेट पेमेंट करू शकतील. बँकेने आपल्या UPI पेमेंट मोडमध्ये अनेक वैशिष्ट्ये जोडली आहेत.
एसबीआय ने २०१७ मध्ये YONO अॅप सुरू केले. त्यानंतर त्याचे ग्राहक वाढतच गेले. बँकेच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत करोडो लोक एसबीआयचे YONO अॅप वापरत आहेत. आता अॅपचा पेमेंट मोड बदलल्याने ६० दशलक्ष लोकांना फायदा होणार आहे. त्याच वेळी, बँकेने सांगितले की, गेल्या वर्षी सुमारे ७८.६० लाख लोकांनी YONO अॅपद्वारे डिजिटल बचत खाती उघडली आहेत.
आता एसबीआयने ग्राहकांसाठी इंटरऑपरटेेबल कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा सुरू केली आहे. या सुविधेनुसार, ग्राहक कोणत्याही एटीएममधून कार्डशिवाय कॅश काढू शकतात. यासाठी ते बँकेचे UPI QR कॅश फीचर वापरू शकतात. कार्डलेस कॅश वैशिष्ट्यामुळे लोकांचे कार्ड गमावण्याचा किंवा त्याचा गैरवापर होण्याचा धोका कमी होईल. याचा फायदाही एसबीआय ग्राहकांना होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड