एसबीआयचा ग्राहकांना धक्का… फिक्सड डिपॉझिट व्याज दरात पुन्हा घट

नवी दिल्ली, १४ सप्टेंबर २०२०: देशातील सर्वात मोठी सरकारी स्टेट बँक ऑफ इंडियानं (एसबीआय) आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिलाय. बँकेनं मुदत ठेवींवरील व्याज दर कमी केले आहेत. यापूर्वी एसबीआयनं २७ मे रोजी एफडीवरील व्याज दरात बदल केला होता. जर आपण एसबीआयमध्ये फिक्स्ड डिपॉजिट ठेवण्याचा विचार करत असाल तर नवीन दराबद्दल जाणून घ्या.

बँकेनं १ वर्षाहून अधिक व २ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी असलेल्या एफडी वर व्याज दर ०.२० टक्क्यांनी कमी केला आहे. आता १ वर्षाहून अधिक व २ वर्षांपेक्षा कमी एफडीला या बँकेत ४.९० टक्के व्याज मिळेल. तर यापूर्वी बँक ५.१० टक्के व्याज देत होती. नवीन व्याजदर १० सप्टेंबरपासून लागू झाले आहेत.

या बदलानंतर आता एसबीआय बँकेत ७ दिवस ते ४५ दिवसांच्या मुदतीच्या एफडीवरील व्याज दर २.९ टक्के आहे, ४६ दिवस ते १७९ दिवसांच्या एफडीवरील व्याज दर ३.९ टक्के आहे, १८० दिवस आणि एक वर्षापेक्षा कमी कालावधीतील एफडीवरील व्याज दर ४.४ टक्के झाला आहे.

१ वर्षाहून अधिक व २ वर्षांपेक्षा कमी ठेवीवर ४.९ टक्के व्याज दिले जाईल. दोन वर्ष ते तीन वर्षांसाठी एफडीवरील व्याज दर ५.१ टक्के राहील, तीन वर्ष ते पाच वर्षांसाठी एफडीवरील व्याज दर ५.३ टक्के आणि पाच वर्ष ते दहा वर्षाच्या एफडीवरील व्याज दर ५.४ टक्के राहील.

हे लक्षात घेण्यासारखं आहे की एसबीआय वीकेअर डिपॉझिट नावाच्या रिटेल टर्म डिपॉझिट विभागात ज्येष्ठ नागरिकांसाठी डिपॉजिट योजना केलीय. ज्यामध्ये गुंतवणूकीची शेवटची तारीख ३० सप्टेंबर होती जी आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आलीय. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना ५ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक मुदतीच्या ठेवींवर अधिक व्याज दिलं जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा