एसबीआय विकणार आपल्या कार्डची हिस्सेदारी

पुणे: एसबीआय आपल्या कार्ड मधील हिस्सेदारी विकत आहे. एसबीआय आपले १४% शेअर आय पी ओ द्वारे विकणार आहे. या अंतर्गत एसबीआय आपले ३.७२ कोटी शेअर विक्रीस काढणार आहे. विकल्या जाणाऱ्या या हिस्सेदारी ची परवानगी बँकेला सेबी, आरबीआय आणि कन्सरन डिपारमेंट यांची परवानगी मिळणे आवश्यक आहे. बँकेकडून तसे प्रयत्नही चालू आहेत. हे द कार्लर ग्रुप आणि एसबीआय बँक यांचे जॉइंट वेंचर आहे. या जॉइंट वेंचर मध्ये एसबीआय ची ७४% हिस्सेदारी आहे तर कार्लर ची २६% हिस्सेदारी आहे.
२०१७ मध्ये कार्लर कंपनी एस बी आय बँकेसोबत एकत्र काम करण्यास सोबत आली. त्यावेळेस एस बी आय कार्ड ची मार्केट व्हॅल्यू ८००० कोटी एवढी होती. सध्या चालू काळात एस बी आय कार्ड ची व्हॅल्यू ५७००० कोटी एवढी आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा