Waqf Amendment Act 2025 Supreme Court hearing : वक्फ (सुधारणा) कायदा २०२५ या घटनात्मक वैधतेला विरोध करणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर दुपारी २ वाजता ही सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणात सत्तरहून अधिक याचिका न्यायालयासमोर सूचीबद्ध करण्यात आल्या आहेत.
या याचिकांमध्ये खासदार असदुद्दीन ओवेसी, काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद, राजदचे खासदार मनोज कुमार झा, खासदार महुआ मोईत्रा, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, जमीयत उलेमा-ए-हिंद, इंडियन युनियन मुस्लिम लीग, समस्थ केरळ जमियतुल उलेमा, दिल्लीचे आमदार अमानतुल्ला खान, समाजवादी पक्षाचे खासदार जिया उर रहमान, बेंगळुरूच्या जामा मशिदीचे इमाम, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, तसेच टीव्हीके अध्यक्ष व तमिळ अभिनेता विजय, सिव्हिल राईट्सच्या संरक्षणासाठी असोसिएशन यांचा समावेश आहे.
दरम्यान, राजस्थान, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र, आसाम, उत्तराखंड आणि छत्तीसगड या राज्यांनी या कायद्याच्या समर्थनार्थ हस्तक्षेप अर्ज दाखल केले आहेत. केंद्र सरकारनेही न्यायालयात केवेट दाखल करत आपली भूमिका मांडण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. या सुनावणीकडे देशभरातून लक्ष वेधले गेले आहे, कारण वक्फ कायद्यातील बदल धार्मिक व मालमत्तेसंबंधी प्रश्नांना गती देणारे ठरू शकतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी,राजश्री भोसले