एससी-एसटी आरक्षणाला दहा वर्षांची मुदतवाढ

मुंबई : अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) च्या आरक्षणाला केंद्रातील मोदी सरकारने आणखी १० वर्षांची मुदतवाढ दिली आहे.
देशाचे कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंगळवारी (दि.१०) संविधान संशोधन (१२६ वी) हे विधेयक लोकसभेत मांडले. त्यानंतर या विधेयकाला मंजुरी मिळाली.
अँग्लो इंडियन समाजातील एससी, एसटीसाठीचे आरक्षण २५ जानेवारी २०२० रोजी संपणार आहे. त्यामुळे आणखी दहा वर्षासाठी म्हणजेच २५ जानेवारी २०३० पर्यंत आरक्षण वाढवण्यासाठी हे विधेयक आहे.
या आरक्षणाचा कलम ३३४ मध्ये समावेश करण्यात आला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा