पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून संसद भवनात राजदंड स्थापित

नवी दिल्ली, २८ मे २०२३: भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश भारताच्या सार्वंभौमत्वाचे दिमाखदार प्रतीक ठरेल, अशीच इमारत देशाच्या संसदेसाठी असावी, ही संकल्पना २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कागदावर मांडली आणि त्यांच्याच कार्यकाळात आज लोकशाहीच्या या सार्वभौम मंदिराचे उद्धाटन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेची नवीन वास्तू आज देशाला समर्पित करणार आहेत.

पंतप्रधान मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री नवीन संसद भवनात सुरू असलेल्या बहु-विश्वास प्रार्थना सभेला उपस्थित आहेत. नवीन संसद भवनात उद्धाटनानंतर ‘सर्व धर्म’ प्रार्थना करण्यात आली. पंतप्रधानांनी इमारतीचे काम करणाऱ्या कामगारांचा सत्कार केला. यानंतर फलकांचे अनावरण केले.

तमिळनाडूतून खास या सोहळ्यासाठी दाखल झालेल्या संतांनी पंतप्रधान मोदी यांना ऐतिहासिक सेंगोल सुपूर्द केला. या राजदंडाचे पुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी संसद भवनात राजदंड स्थापित केला. संसदेच्या नवीन इमारतीत स्थापनेपूर्वी अधेनामांच्या वैदीक मंत्रोच्चारात राजदंडाला अभिषेक करण्यात आला. या उद्धाटन सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा