रशिया, २६ सप्टेंबर २०२२ : मध्य रशियातील इझेव्हस्क शहरातील एका शाळेत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. तर या घटनेमुळे युक्रेन युद्धादरम्यान खळबळ माजली आहे. या गोळीबारात ७ मुलांसह मृतांची संख्या १३ वर पोहोचली आहे. तर २० जण जखमी झाले आहेत. जखमी व मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. या हल्ल्यानंतर बंदूकधाऱ्याने आत्महत्या केल्याचे रशियाच्या तपास समितीने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार इझेव्हस्क शहरात एका शाळेत बंदूकधाऱ्याने गोळीबार केला आहे. तस ती शाळा रिकामी करण्यात आली असून आजूबाजूच्या परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे तर या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मृतांमध्ये ७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी शहरातील शाळा क्रमांक ८८ मध्ये शिकत होते.
या हल्लेखोरांची ओळख पटवली जात आहे. गोळीबार करणाऱ्या या व्यक्तीने स्की मास्क आणि नाझी चिन्हे असलेला काळा टी-शर्ट घातल्याचे सांगण्यात येत आहे.
गोळीबारात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाळेत गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर विद्यार्थी शिक्षक आणि शाळेतील इतर कर्मचारी घटनेच्या वेळी एका छोट्या खोलीत लपून बसले होते. या घटनेचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. AFIP न्यूज एजन्सी अंतर्गत मंत्रालयाच्या हवाल्याने मध्यवर्ती शाळेत गोळीबार झाल्याचे वृत्त दिले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे